कोल्हापुरात दारुड्या रिक्षाचालकाचा थरार! नवीन वाशी नाका ते कळंबा रोडवर अपघात, महिला प्रवासी जखमी

कोल्हापुरात दारुड्या रिक्षाचालकाचा थरार! नवीन वाशी नाका ते कळंबा रोडवर अपघात, महिला प्रवासी जखमी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथे नवीन वाशी नाका ते कळंबा साईमंदिर रोडवर एका मध्यधुंद रिक्षाचालकाचा थरार पाहायला मिळाला आहे. दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात रिक्षातील महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटना घडताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातानंतर स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झालेत. तसेच नवीन वाशी नाका ते कळंबा साईमंदिर रोडचा काही भाग खराब झाला आहे. या खराब रस्त्यामुळे या ठिकणी अपघात होत असतात. त्यामुळं हा रस्ता तातडीने करण्याची मागणी स्थानिक नागरिक करू लागलेत. 

 तर घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यधुंद रिक्षाचालकावर कारवाई करत त्याला त्याब्यात घेतलं आहे.