कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्त सभासदांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्त सभासदांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि., कोल्हापूर यांच्या वतीने सभासदांच्या मुला - मुलींच्या शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील प्राविण्याबद्दल तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ सोहळा संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चेअरमन श्रीकांत चव्हाण यांनी भूषवले. प्रा. युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी एकूण ११८ गुणवंत विद्यार्थी, ३६ सेवानिवृत्त सभासद व वर्ग १ मध्ये पदोन्नती मिळालेल्या ९ सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चेअरमन श्रीकांत चव्हाण यांनी केले. संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. आभार व्हा. चेअरमन रविंद्र जरळी यांनी मानले.

पश्चिम महाराष्ट्रात एस.एम.एस. बँकिंग सुविधा तसेच RTGS/NEFT/IMPS आणि मोबाईल ॲप सुविधा सुरू करणारी पहिली पगारदार पतसंस्था म्हणून या संस्थेने लौकिक प्राप्त केला आहे.

संस्थेचे ३० सप्टेंबर २०२५ अखेरचे आर्थिक विवरण पुढीलप्रमाणे –

भागभांडवल ₹१० कोटी ५८ लाख, ठेवी ₹२२८ कोटी ५२ लाख, निधी ₹२५ कोटी ३४ लाख, सभासद कर्जे ₹२२४ कोटी १२ लाख, गुंतवणूक ₹४१ कोटी ६० लाख, नफा ₹३ कोटी २७ लाख, तर खेळते भांडवल ₹२८० कोटी ९४ लाख आहे.

सभासदांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अद्ययावत ग्रंथालय सुरू करण्यात आले असून, मुख्य कार्यालयासाठी २० के.व्ही. क्षमतेचे सौरऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहे.

यावेळी व्हा. चेअरमन रविंद्र जरळी, मॅनेजर व्ही.एन. बोरगे, संचालक मंडळाचे सदस्य सुनिल पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, नंदिप मोरे, जयकुमार रेळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, तज्ञ संचालक दीपक बुरूड, अशोक पाटील तसेच मार्गदर्शक विश्वास साबळे, एम. आर. पाटील, महावीर सोळांकूरे, एम. एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट आदी मान्यवर उपस्थित होते.