क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर अंबाबाईच्या चरणी सपत्नीक नतमस्तक; विरेंद्र मंडलिकांची उपस्थिती

क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर अंबाबाईच्या चरणी सपत्नीक नतमस्तक; विरेंद्र मंडलिकांची उपस्थिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचे भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांनी सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातलग वीरेंद्र मंडलिक सपत्नीक उपस्थित होते. 

कसोटी , एकदिवसीय व टी -२० अशा सर्व क्रिकेट फॉरमॅट मध्ये अष्टपैलू खेळाडू अशी शार्दुल ठाकूर यांची क्रिकेट जगतात ओळख आहे.  पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲड. वीरेंद्र मंडलिक यांचे ते साडू आहेत. करवीर निवासीनी  अंबाबाईच्या मंदिरात त्यांचे सपत्नीक आगमण झाले. यावेळी त्यांच्या सोबत ॲड. विरेंद्र मंडलिक व त्यांच्या पत्नी संजना मंडलिक यांनी ही अंबाबाईच्या चरणी लीन होत मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने शार्दूल ठाकूर यांचे  स्वागत करण्यात आले.