क्रिडाई कोल्हापूर आयोजित वास्तू विषयक प्रदर्शन (दालन) मंडप उभारणीस सुरुवात
कोल्हापूर (प्रतिनिधी) - क्रिडाई कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक सर्वोच्च शिखर संघटना असून क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन (दालन) ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान महासैनिक दरबार हाॅल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या शुभ हस्ते व दालनचे चेरमन महेश यादव, व्हा. चेरमन आदित्य बेडेकर,समन्वयक निखिल शाह क्रिडाईचे सेक्रेटरी गणेश सावंत, दालन सेक्रेटरी संग्राम दळवी तसेच दालनचे पदाधिकारी सभासद यांच्या उपस्थितीत रविवार 11 जानेवारी रोजी संपन्न झाला. क्रिडाई अध्यक्ष के. पी.खोत यांच्या हस्ते मंडप उभारणी कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.

क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत क्रिडाईने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराचा विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला. दालन बदल माहिती देताना या दालनचे वैशिष्ट म्हणजे सन 1992 साली बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली. यंदाचे दालन 2026 हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे 13 वे दालन आहे. या दालनचे उदघाटन शुक्रवार 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. दालन 2026 विषयी माहिती देताना दालनचे चेअरमन महेश यादव यांनी या प्रदर्शनाचा मुख्य हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन बांधकाम प्रकल्प व तत्रंज्ञान, बांधकाम विषयक साहित्य, सेवा अर्थसाहाय्य योजना यांची माहिती मिळणार असून घराचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरविण्यात या प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार असून याचे लक्ष यंदा संधी सर्वांसाठी असे आहे.
या दालनचे प्रायोजक पुढीलप्रमाणे -
प्लॅटिनम स्पॉन्सर -1) आर्या स्टील्स् रोलिंग प्रा. लि
डायमंड स्पॉन्सर- 1)इटाका सिरमिक्स 2)एसकॉन इस्पत प्रेस्टिज एल एल पी.
गोल्ड स्पॉन्सर (बिल्डर्स)1)केवेस्ट इन्फ्रा अँड हायवेस्ट डेव्हलपर्स
गोल्ड स्पॉन्सर- 1) अविष्कार इन्फ्रा 2)मोटो टाईल्स 3) स्टेट बँक ऑफ इंडिया 4)यश पॉली 5) सिम्पोलो टाईल्स
सिल्वर स्पॉन्सर-1)विन्डो एक्स्पर्ट 2) एच आर विंडटेक ( व्ही इ के प्रा. ली. 3)तेजस इंडस्ट्रिज 4)युनियन बँक ऑफ इंडिया
सेमी कॉ स्पॉन्सर 1) फेराकॉल 2) स्मॅश इलेव्हटर 3)बँक ऑफ इंडिया 4) एनएन आयटी कार पार्किंग सिस्टीम प्रा. ली. 5) वोक्स इंटेरियर आणि एक्सटेरियर सोलुशन प्रा. ली. 6)हायड्रा पार्क 7)ग्रेट व्हाईट ग्लोबल 8) पॅरीवेअर रोका 9) लिशा स्वीचेस 10) ओटीस इलेव्हटर्स 11) कोने इलेव्हटर्स वरील सर्व प्रयोजकांची दालन 2026 यशस्वी होण्यासाठी मदत लाभली आहे.
कोल्हापूर परिसरातील सिव्हिल इंजिनीरिंगच्या विद्यार्थी याच्यासाठी शनिवार 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता टेक्निकल सेमिनार आयोजित केले असून, रविवार दिनांक 1 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सुसंवाद साधणार आहेत. सांगता समारंभ सोमवार दिनांक 2 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे. शेवटी आभार प्रदर्शन सचिव गणेश सावंत यांनी केले.
या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के. पी.खोत उपाध्यक्ष प्रकाश देवालापूरकर,चेतन वसा,सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड,दालन चेअरमन महेश यादव, व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शाह, सह समन्वयक पवन जामदार, दालन सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे,बिझनेस प्रोमोशन चेअरमन गौतम परमार,ग्राउंड कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील, डिझाईन, प्रिटिंग कमिटी चेअरमन विजय माणगांवकर, हॉस्पीटीलिटी कमिटी चेअरमन केतन शाह, सोवियनर कमिटी चेअरमन संदीप बोरचाटे, स्टॉल ऑलॉकेशन कमिटी चेअरमन तुषार बेर्डे तसेच क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विदयानंद बेडेकर, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, सुजय होसमनी, विवेकानंद पाटील,श्रेयांश मगदूम, शंकर गावडे,क्रिडाई कोल्हापूरचे सह खाजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल,सुनील चिले,तसेच सभासद,प्रायोजक, स्टॉलधारक मोठ्या संख्येने हजर होते.




