गारगोटीत ‘नंदादीप नेत्रालय’ चा शुभारंभ

गारगोटीत ‘नंदादीप नेत्रालय’ चा शुभारंभ

गारगोटी - सांगलीत गेली ४५ वर्षे यशस्वी सेवा देत असलेले डॉ. पटवर्धन यांचे ‘नंदादीप नेत्रालय’ आता गारगोटीतही सुरू झाले आहे. गारगोटी येथील बसस्थानकाजवळ साई मंदिरासमोर असलेल्या हिंदतारा कॉम्प्लेक्समध्ये या नव्या शाखेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक हिंदूराव देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नेत्रालयाचे मुख्य व्यवस्थापक विठ्ठल चव्हाण, मार्केटिंग प्रमुख जावेद बिजापुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानिमित्त या शाखेत पुढील एक महिना नेत्र तपासणीची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, शासनाच्या विविध योजनांतर्गत तसेच कॅशलेस पद्धतीने मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याची सोय देखील करण्यात आली आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन ‘नंदादीप’ नेत्रालयाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.