प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते क्रिडाई क्लस्ट ॲप्लिकेशन ॲपचे उद्घाटन

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते क्रिडाई क्लस्ट ॲप्लिकेशन ॲपचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - क्रिडाई कोल्हापूर ही बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असून, कोल्हापूर शहराच्या विकासात व सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेत आलेली आहे. क्रिडाई कोल्हापूर ची मासिक सभा हॉटेल अयोध्या येथे झाली. या सभेत क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांच्या साठी , क्रिडाई कोल्हापूर व व्हेलोस टेक्निसाईटस प्रा.लि.(Veloce Technisights Pvt.Ltd) चे प्रमुख हर्षवर्धन साळोखे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडाई क्लस्ट ॲप्लिकेशन नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या शुभहस्ते, क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, सहसचिव निखिल शहा, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव, क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्या उपस्थितीत झाले.

प्रास्ताविकात क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत यांनी क्रिडाई करीत असलेल्या कार्याच्या आढावा घेत या ॲप च्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक व बांधकाम मटेरियल विक्रेत्यांना, काँन्ट्रॅक्टर , सेवा पुरवठादार , बँक यांना एकाच ॲप मध्ये समाविष्ट करुन क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांना त्याचा लाभ घेता येणार आहे.तसेच त्यांना विक्रेत्यांची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे असे सांगितले. तसेच क्रिडाई कोल्हापूर च्या काही प्रलंबित मागण्या प्रशासक यांचे समोर मांडल्या.प्रशासक मॅडम यांनी सदर ॲपला शुभेच्छा दिल्या व या ॲप चा वापर सर्व सभासदांनी करावा असे सांगितले व आपल्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

तसेच व्हेलोस टेक्निसाईटस (Veloce Technisights Pvt.Ltd ) चे प्रमुख हर्षवर्धन साळोखे यांनी या ॲप चा कसा उपयोग होणार आहे व त्याचे महत्व पटवून दिले.

तसेच क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत यांनी क्रिडाई कोल्हापूर आयोजित गृह प्रकल्प बांधकाम विषयक व वास्तू विषयक प्रदर्शन (दालन) हे ३० जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान महासैनिक दरबार ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले असल्याचे जाहीर केले. तसेच या येणाऱ्या दालनसाठी क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव यांची चेअरमन पदी व निखिल शहा यांची समन्वयक पदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. शेवटी सचिव गणेश सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.

या सभेत क्रिडाई कोल्हापूर मॅनेजिंग कमिटी सदस्य, सभासद, क्रिडाई युथ व वुमेन्स विंगचे सदस्य, दालन २०२४ चे प्रायोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.