गुटखा विक्री करणाऱ्या एकास अटक ; १ लाख ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

गुटखा विक्री करणाऱ्या एकास अटक ; १ लाख ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी (प्रतिनिधी) - गुटखा विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वसीम यूनुस तांबोळी वय 29, रा. इचलकरंजी असे अटक केलेल्याचे नाव असून याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीची सुगंधी तंबाखू व सुपारी, पान मसाला व सुगंधी जर्दा असा एकूण १ लाख ७१ हजार ७१० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त पोलीसांनी केला आहे. 

वसीम तांबोळी हा त्याच्या राहत्या घरी पान मसाला व तंबाखुचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली असता, पथकाने त्याच्या राहत्या घरी छापा टाकून विक्री करण्यासाठी आणलेला गुटखा जप्त केला. पुढील तपास इचलकरंजी पोलीस करीत आहेत. 

या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील यांच्यासह आदी पोलीसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.