जयसिंगपूर येथे चरस विक्री करणाऱ्या एकास अटक ; 76 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर (प्रतिनिधी) - उमळवाड फाटा जयसिंगपूर येथे चरस विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे, वय 39, रा. माळभाग उमळवाड असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून 37 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण 76 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पथकाला माहिती मिळाली की, दिलदार कांबळे हा उमळवाड फाटा येथे चरस या अमंली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने उमळवाड फाटा जयसिंगपूर येथे सापळा रचून दिलदार कांबळे याला ताब्यात घेतले. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार महेश पाटील, महेश खोत यांच्यासह आदी पोलीसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.




