जि.प.उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी घेतली विकास कामाबाबत आढावा बैठक

जि.प.उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी घेतली विकास कामाबाबत आढावा बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील विविध विकास कामे व  अडचनी सोडविण्यासाठी  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी विकास कामाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत करवीर पंचायत समिती बी.डी.ओ संदीप भंडारे यांनी तालुक्यातील विकास कामांची माहिती दिली.

उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी तालुक्यातील सर्व घरकुल योजना, बळीराज पांणद योजना सर्व योजनांचा आढावा घेऊन शासनाच्या योजना सामान्य़ नागरिकापर्यत विनाविलंब पोहचवण्याच्या सुचना दिल्या. त्याच बरोबर करवीर पंचायत समिती इमारत व जागेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे सदरचा प्रश्न सोडवणेसाठी  खासदार धनंजय महाडिक यांच्याशी  चर्चा करुन बैठक आयोजित करणेचे ठरले.

           या बैठकीला पंचायत समिती करवीरचे सभापती साताप्पा पाटील, उपसभापती दिपाली पाटील व सर्व पंचायत समिती सदस्य,  करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप भंडारे तसेच विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.