नंदादीपमध्ये ‘PHACOTIPS 6.0’ आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
कोल्हापूर / प्रतिनिधी : नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचे झाले लोकार्पणकोल्हापूर:नंदादीप मेडिकल केअर फाउंडेशन आणि नंदादीप फॅको ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित ‘PHACOTIPS 6.0’ ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रशिक्षण परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. डॉ. सौरभ पटवर्धन व डॉ. निधी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ते २१ जुलै २०२६ दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेत भारतासह अमेरिका, ब्राझील, बल्गेरिया आणि मेक्सिको या देशांतील जागतिक दर्जाच्या नेत्ररोगतज्ज्ञांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवला.अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचे लोकार्पणया आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे 'Patwardhan's Angle Alpha Calculation Method' चे सादरीकरण हे होते. यासोबतच ‘Angle Alpha Patwardhan’ हे विशेष मोबाईल अॅप आणि ‘PhacoTips.com’ या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाचे (Platfom) भव्य लोकार्पण करण्यात आले.
नंदादीपचे ज्येष्ठ मोतीबिंदू शल्यविशारद डॉ. दिलीप पटवर्धन आणि डॉ. माधवी पटवर्धन यांच्या हस्ते या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. या डिजिटल प्रणालीच्या यशस्वी निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल कुशल पटवर्धन यांचा परिषदेत विशेष सन्मान करण्यात आला.
नेत्रविज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगडतीन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, थेट (Live) शस्त्रक्रियांचे सादरीकरण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांमध्ये झालेला ज्ञानविनिमय यामुळे उपस्थितांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील नव्या दिशा समजून घेता आल्या. नेत्रविज्ञान क्षेत्रातील डॉक्टरांच्या कौशल्य विकासासाठी आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरली आहे, असा सूर या वेळी तज्ज्ञांनी व्यक्त केला.




