मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पूरबाधितांच्या मदतीसाठी कोल्हापुरात गुरुवारी बैठक
कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील पूरबाधितांच्या मदतीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुरुवार २५ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली आहे. शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे नेतेमंडळी, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर आणि कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त पिडीत शेतकरी, कष्टकरी, नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मदत साहीत्य पाठविण्यासाठीची पुर्व तयारीची ही बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, स्वरुपाताई पाटील-यड्रावकर, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, माजी आमदार अशोकराव जांभळे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील(बापु), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, शहराध्यक्ष अदील फरास, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे यांच्यासह मान्यवर, नेतेगण व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तालुकाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, जिल्हा सेलचे जिल्हाध्यक्ष, नगर पालिका/महानगर पालिकांचे प्रमुख पदाधिकारी, के.डी.सी.सी.बॅंक, बाजार समिती, गोकुळ दुध संघ, शेतकरी संघ, साखर कारखाना संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह मान्यवर नेतेगण व प्रमुख पदाधिकारी यानी उपस्थित राहण्याचे आवाहन निवेदनात केले आहे.




