महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपकडून महापालिकेच्या स्मशानभूमीस तीन लाकूड कटिंग यंत्रांची भेट
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत महावीर गार्डन परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमींसाठी तीन लाकूड कटिंग यंत्रांची भेट देण्यात आली. महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष मदन कानडे आणि उपाध्यक्ष राहुल हळदे यांनी ही यंत्रे महापौर रुपाराणी निकम व महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द केली. हा कार्यक्रम महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात संपन्न झाला.

यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत खतकर, अभिजीत मोकाशी, राहुल माने, नगरसेविका सृष्टी जाधव, माधूरी व्हटकर, पुर्वा राणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, पल्लवी देसाई, राजनंदा महाडीक,माधूरी नकाते, वंदना मोहिते, निलांबरी साळोखे, शहर अभियंता रमेश मस्कर, सहा.अभियंता विद्युत नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, निलेश देसाई आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या स्मशानभूमीतील दैनंदिन कामकाज अधिक सुलभ व कार्यक्षम होण्यासाठी या लाकूड कटिंग यंत्रांचा उपयोग होणार असून, महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपने केलेल्या या सामाजिक योगदानाचे महापौर व आयुक्त यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले.




