मेतके येथील बाळूमामा मंदिरात अधिक मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कागल (प्रतिनिधी): सद्गुरू बाळूमामा यांचे मूळक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या मेतके ता.कागल येथील श्री हालसिद्धनाथ - बाळूमामा मंदिरात अधिक महिन्यानिमित्त १८ मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ मे रोजी सकाळी सद्गुरू बाळूमामांना अभिषेक, शुद्धतेसाठी उदक शांती व कार्यक्रमाच्या निर्विध्न पूर्तेसाठी गणेशयाग, दि. २१ मे रोजी गुरुपुष्यामृत योगावर दत्तयाग, दि. २४ रोजी नवचंडी (सप्तशती हवन) सोहळा, दि. २८ रोजी लघुरुद्र स्वाहाकार, दि. ३१ (पौर्णिमा) रोजी नवनाथ स्वाहाकार, दि. ४ जून रोजी विष्णुयाग, दि. ७ जून रोजी पंचमुखी हनुमान कवच हवन, दि. ११ जून रोजी बाळूमामा व हालसिद्धनाथ नाममंत्र हवन, आशीर्वाद, देवतांना गंगास्नान (अवभृत स्नान) व कार्यक्रमाची सांगता होईल.
भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.




