कोल्हापूर महापालिकेचा दणका: विनापरवाना होर्डिंगधारकांना ५ पट दंडाच्या नोटिसा; ५ लाख ७३ हजारांचा दंड वसूल होणार
कोल्हापूर: शहरात अनधिकृत आणि विनापरवाना लावण्यात आलेल्या होर्डिंगविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाने कठोर पावले उचलली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार हाती घेण्यात आलेल्या धडक तपासणी मोहिमेत ४ प्रमुख प्रकरणांमध्ये जाहिरात शुल्काच्या ५ पट दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून वाहतुकीस अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. यामुळे शहरातील सर्वच होर्डिंगची सखोल तपासणी करून विनापरवाना फलक तातडीने हटवण्याचे आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
कारवाईचा तपशील व दंडाची रक्कम:
हॉटेल महाराजा डिलक्स (लिशा हॉटेल चौक): ₹६२,०००
दिप वाईन्स (लिशा हॉटेल चौक): ₹४६,५००
तनवानी लिकर्स (तावडे हॉटेल चौक, गांधीनगर): ₹१,५५,०००
रोहित कोरवी, रोड साईन अॅड. लक्ष्मण कल्लाप्पा कांबळे व प्रकाश लक्ष्मण कांबळे (निंबाळकर माळ, सदर बाजार रोड): ₹३,१०,०००
प्रशासकीय पथक व पुढील मोहीम:
ही धडक कारवाई उपआयुक्त किरण धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त रामचंद्र काटकर आणि इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे यांच्या पथकाने केली.
शहरात यापुढेही अनधिकृत फलक आणि होर्डिंगविरोधात कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी व जाहिरातदारांनी आपले होर्डिंग महापालिकेच्या नियमानुसार तातडीने अधिकृत करून घ्यावेत, असे आवाहन इस्टेट विभागाने केले आहे.




