मोठी बातमी : नगरपरिषद - नगरपालिका मतमोजणीची 'ही' नवीन तारीख जाहिर

मोठी बातमी : नगरपरिषद - नगरपालिका मतमोजणीची 'ही' नवीन तारीख जाहिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला असून मतदान सायंकाळी साडेपाचपर्यंत चालणार आहे. मात्र, आता  नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आयोजित नगरपंचायत निवडणुकीसाठी कागल मतदारसंघात 13.72 % मतदान तर मुरगूड मतदारसंघात 13.44 % इतके मतदान सकाळी 9.30 पर्यंत मतदान झालेले आहे.  राज्यातील 226 नगरपरिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान सुरू झाले आहे. राज्यभर ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली आहे.