'या' कामामुळे परीख पुलाचा एकेरी रस्ता वाहतुकीस बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपूरी कार्यक्षेत्रातील परीख पुल परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटर करण्याचे काम आजपासून सुरू केले आहे. त्यासाठी नागरिकांना आर.एल.ज्वेलर्स ते जेम्सस्टोन कडून परिख पुलाकडे येणारी वाहूतक व रेल्वे फाटकाकडून जेम्सस्टोनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली.

तर मध्यवर्ती बस स्थानकाच्या कंपाऊंडला लागून परिख पुलाकडे येणारा जो रस्ता आहे. हा रस्ता एकेरी वाहतूकीस सुरू ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खुला करुन त्यानंतर दुसऱ्या बाजुचा मध्यवर्ती बस स्थानकालगत असलेला एकेरी वाहतुकीचा रस्ता व टाकाळयाकडे जाणारा रस्ता बंद ठेवून तेथील काम पूर्ण करुन घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी हे काम पुर्ण होईपर्यंत पर्यायी रस्ताचा वापर करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




