शैक्षणिक कार्यक्षमतेत कोल्हापूर जिल्हा परिषद देशात अव्वल

शैक्षणिक कार्यक्षमतेत कोल्हापूर जिल्हा परिषद देशात अव्वल

 कोल्हापूर (प्रतिनिधी): ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकेविला आहे केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट म्हणजे शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी मध्ये 2024- 25 जिल्हा परिषदेने हे यश मिळविले आहे.

 जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात राबवलेल्या विविध उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे. इंडेक्सच्या एकूण सहाशे गुणांपैकी 463 गुण पटकविले. यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस यांनी राबवलेल्या सर्व उपक्रमांची दखल घेऊन हे मानांकन दिले आहे.

  केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट नुसार शैक्षणिक निर्देशांक निश्चित केले जातात. मिशन उत्कर्ष उपक्रम राबविला, दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला, विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा आणि रंजक वाटावे यासाठी विविध युक्त्या, डिजिटल व्हिडिओ, ऑनलाइन सराव चाचण्या आदी उपक्रम राबविण्यात आले. 

 कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स या अभिनव उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे कौतुक केले होते.

या यशामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर व प्राचार्य, डॉ. राजेद्र भोई यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य स्वच्छता आणि शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले.

 या कार्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन राज्यस्तरीय समितीवर कार्तिकेयन. एस यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

   शिक्षण विभागाच्या या यशाबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षण सभापती शितल यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅसमिन यांनी सर्वांचे अभिनंदन केले.