सक्षम पतसंस्थेचा लाभांश १२ टक्के - अनिल बागणे
यड्राव - "पतसंस्था ह्या समाजातील सामान्य लोकांसाठी गुंतवणूक व कर्जासाठी सहाय्य करतात. त्यांच्या आर्थिक अडचणीत सहाय्य व्हावे. त्यातून त्यांची आर्थिक स्तर उचांवेल या उद्देशाने सक्षम पतसंस्था निर्माण झाली आहे. त्याला सभासदांनी ताकद दिली आहे. त्यामुळेच सहा वर्षात चार शाखेसह उत्कृष्ट व्यवसाय व नफा मिळविला आहे. त्यामुळे सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येत आहे." असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष अनिल बागणे यांनी केले. ते सक्षम नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहाव्या वार्षिक सर्वसाधरण सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष महावीर खवाटे, सर्व संचालक प्रमुख उपस्थीत होते.

बागणे पुढे म्हणाले, "पतसंस्था ह्या समाजातील नागरीकांचा पत सुधारणेसाठी सहाय्य करीत असतात. त्याप्रमाणे ठेवीदार व कर्जदार यांना हि पतसंस्था सक्षम करीत आहे. नागरीकांच्या विश्वासामुळेच अल्पावधीत प्रगतीकडे वाटचाल करत असून समाजाच्या विकासासाठी आपली संस्था काम करीत आहे." यावर्षीपासून सभासदाना लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सल्लागार राजेंद्र जुगळे म्हणाले, इतक्या कमी वयातील पतसंस्था १२ टक्के लाभांश देणारी एकमेव संस्था आहे. तसेच स्थापनेपासून १०० टक्के वसूलीचा पायंडा पाडला आहे. संस्था कार्यक्षेत्र वाढवून जिल्ह्यात शाखा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशीच प्रगती करीत भविष्यात मल्टिस्टेट होईल.
स्वागत प्रा. एम. एम. कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन कल्याणी बेडेकर यांनी केले. आभार उपाध्यक्ष महावीर खवाटे यांनी मानले. यावेळी सभेपुढे ठेवलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच सभासद व सभासदांचे पाल्य यांनी प्राविण्य मिळविले आहे त्यांचा सन्मान करण्यात आला. विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक राजगोंडा पाटील यांनी केले.
यावेळी संचालक दामोदरप्रसाद मालपाणी, विजयकुमार पाटील, अनिल चव्हाण, वर्धमान पाटील, शेखर देशपांडे, शीलकुमार पाटील, विजित पाचोरे, मनोज पाटील, स्वप्निल हेरवाडे, सहदेव कांबळे, मिनल सौंदत्ते, रचना पाटील, कुबेर मगदूम, प्रविण यादव यांच्यासह सभासद, सेवकवर्ग उपस्थित होते.




