सावित्रीबाई फुले जयंती व यशस्वीनी सामाजिक अभियान वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम

सावित्रीबाई फुले जयंती व यशस्वीनी सामाजिक अभियान वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) - ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती तसेच यशस्वीनी सामाजिक अभियानाच्या वर्धापन दिनानिमित्त बचत गटातील महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांना नव्या जिद्दीने आणि नव्या उमेदीने रोजगारनिर्मितीकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी उमेद व मावीम अंतर्गत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती महिलांना देण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक अनुभवी महिला उद्योजिकांनी आपले यशस्वी अनुभव सांगून इतर महिलांना प्रेरणा दिली.

या कार्यक्रमात सीआरपी संगीता पाटील यांनी बचत गटातील महिलांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले व मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. किशोरी भोसले होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून संजोत कुलकर्णी आणि मनीषा कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन अश्विनीताई माने यांनी केले होते.

या कार्यक्रमास वर्षा भोसले, नीता पाटील, श्रावणी श्रीखंडे, मीनाक्षी भुजबळ, शीला पाटील, लक्ष्मी गावडे, जयश्री पिंपळे यांच्यासह बचत गटाच्या अनेक महिला उपस्थित होत्या.