सुहास देशपांडे यांना 'इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग'मध्ये पीएच.डी.
कोल्हापूर/ प्रतिनिधी : उद्योजक सुहास प्रभाकर देशपांडे यांनी डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (लीन मॅनेजमेंट) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

त्यांनी "एनहान्सिंग इंडियन एसएमईज थ्रू लीन मॅन्युफॅक्चरिंग फॉर सस्टेनेबल ग्लोबल ग्रोथ" या विषयावर संशोधन केले. भारतीय लघु व मध्यम उद्योगांना (SMEs) लीन मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून जागतिक स्तरावर शाश्वत आणि स्पर्धात्मक वाढ कशी मिळवून देता येईल, याचा अभ्यास त्यांनी या प्रबंधात केला आहे.
त्यांना प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांचे मुख्य मार्गदर्शन, तर डॉ. एम. एम. नरके यांचे सह-मार्गदर्शन लाभले. सुहास देशपांडे यांच्या प्रदीर्घ व्यावहारिक अनुभवामुळे या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले.




