अभिनेते धर्मेंद्र यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा कर्मचारी अटकेत

अभिनेते  धर्मेंद्र यांचा 'तो'  व्हिडिओ व्हायरल करणारा कर्मचारी अटकेत

मुंबई - अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत मागील काही दिवसांपासून ठीक नसून काही काळ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी दाखल करण्यात आले आहे. 10 डिसेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालवल्यानंतर त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरायला लागल्या होत्या, मात्र कुटुंबीयांनी पुढे येत सर्व बातम्यांचे खंडन केले आणि धर्मेंद्र यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती दिली.

दरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या कर्मचाऱ्याने धर्मेंद्र आणि देओल कुटुंबियांचे हॉस्पिटलमधील खासगी क्षण चोरून मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर तो वेगाने व्हायरलही झाला आहे. सध्या पोलीस या व्हिडिओच्या लीकमागचे कारण आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र हॉस्पिटलच्या बेडवर दिसतात आणि त्यांच्या शरीराला विविध मशीन जोडलेली दिसतात. त्यांच्या आजूबाजूला कुटुंबीय उपस्थित आहेत. सनी आणि बॉबी देओल भावुक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरही त्यांच्या शेजारी दिसत असून त्या देखील भावनात्मक झालेल्या दिसतात. त्यांचे नातू करण आणि राजवीर यांचीही उपस्थिती दिसून येते. हा व्हिडिओ चोरून शूट करणाऱ्या कर्मचाऱ्याची ओळख पटताच त्याला अटक करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/reel/DQ-JTwaDSfb/?utm_source=ig_web_copy_link

याबाबत भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी माध्यमांकडून करण्यात आलेल्या असंवेदनशील रिपोर्टिंगवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.