आशिया कप 2025 साठी भारतीय टी - 20 संघाची घोषणा ; सूर्यकुमार यादव काय म्हणाला..?

आशिया कप 2025 साठी भारतीय टी - 20 संघाची घोषणा ; सूर्यकुमार यादव काय म्हणाला..?

Criket News - आशिया कप 2025 साठी भारतीय टी - 20 संघाची घोषणा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी केली. यावेळी, संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला थोडाच वेळ आधी समजले की, शुभमन गिल देखील संघात समाविष्ट आहे आणि त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. क्रिकेट विश्वाच्या माहितीनुसार, गिलच्या या समावेशामुळे सूर्यकुमार यादव थोडासा आश्चर्यचकित झाला होता.

अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना शुभमन गिलने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळावे आणि भविष्यात संघाचं नेतृत्वही करावं, अशी अपेक्षा आहे. यासाठी गंभीर यांनी गिलच्या IPL 2025 मधील कामगिरीचा विशेष उल्लेख केला असल्याचं समजतं. 26 वर्षीय शुभमन गिल सध्या भारतीय क्रिकेटमध्ये ठाम पाऊल रोवत आहे. तो सध्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार असून, भविष्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

या बदलावर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार यादवने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, मी खोटं बोलणार नाही, अशी भीती प्रत्येकाला वाटते. पण हीच भीती प्रेरणादायी असते. मी गिलसाठी खूप आनंदी आहे की तो दोन फॉरमॅटमध्ये कर्णधार बनला आहे. आमच्यातील मैत्री मैदानात आणि मैदानाबाहेरही खूप छान आहे. ही भीती तो आपल्या कामगिरीवर परिणाम करू देत नाही. जर मी अशा गोष्टींनी प्रभावित होणारा असतो, तर माझा पहिला आंतरराष्ट्रीय सामना मी तसाच खेळू शकलो नसतो. मी ही भीती खूप आधी मागे टाकली आहे. जर एखादा खेळाडू मेहनत करतो आणि प्रामाणिक राहतो, तर बाकी सगळं आपोआप घडतं. 

रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शुभमन गिलला कसोटी संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. त्यानंतर एकदिवसीय संघाचं नेतृत्वही रोहितकडून काढून गिलकडे सोपवण्यात आलं. आशिया कप 2025 मध्ये गिलला उपकर्णधार नेमण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्व कौशल्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.