कोगे-बहिरेश्वर पुलावर दुसऱ्यांदा पाणी,प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

कोगे-बहिरेश्वर पुलावर दुसऱ्यांदा पाणी,प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कोगे-बहिरेश्वर पुलावर दुसऱ्यांदा पाणी आले असून नागरिकांनी कसबा बीड मार्गे जाण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. आठवडयाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे कोगे बहिरेश्वर पुलावर दुसऱ्यांदा पाणी आले आहे. 

त्यामुळे बहिरेश्वर मार्गे जाणाऱ्या बीडशेड, म्हारूळ, आमशी व बारा वाड्या यामार्गे जाणाऱ्या नागरिकांनी कसबा बीड मार्गे किंवा कुडीत्रे सांगरूळ मार्गे प्रवास करावा असे बहिरेश्वर व कोगे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे .पाण्यातून प्रवास करणे, जीवितास धोका होऊ शकतो त्यामुळे कोणीही पाण्यातून प्रवास करण्याचे धाडस करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत व पाणी आल्याने प्रवास बंद हा बोर्डहि लावण्यात आला आहे.