कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी संपत पाटील आणि अमोल माने; तीन ब्लॉक अध्यक्षांच्याही नियुक्त्या जाहीर

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी संपत पाटील आणि अमोल माने; तीन ब्लॉक अध्यक्षांच्याही नियुक्त्या जाहीर

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असून, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव चव्हाण-पाटील आणि माजी नगरसेवक ॲड. अमोल माने यांची जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 'संघटन सुजन अभियानांतर्गत काही दिवसांपूर्वी निरीक्षकांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून अहवाल तयार केला होता. या दौऱ्यादरम्यान ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात प्रदेश कार्यालयाकडे शिफारसी पाठवण्यात आल्या होत्या.

या शिफारसींचा विचार करून, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ब्लॉक अध्यक्ष म्हणून खालील नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे:

·         संजय यशवंत पटकारे

·         राजदीप माधवराव भोसले

·         उत्तम वसंतराव शेटके

या तीन ब्लॉक अध्यक्षांसोबतच संपत पाटील आणि ॲड. अमोल माने यांच्यावर प्रवक्तेपदाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.