कोल्हापूर ज़िल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटील यांची निवड

कोल्हापूर ज़िल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटील यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या रिक्त झालेल्या संचालकपदी प्रकाश विठ्ठल पाटील अध्यापक वि.मं. परखंदळे, ता. पन्हाळा यांची दि.०८/०९/२०२६ रोजी बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून श्री. युसुफ शेख, सहाय्यक निबंधक, अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर हे होते. संचालक पदासाठी प्रकाश पाटील यांना श्रीकांत चव्हाण सुचक व सुनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सहकारामधील दिपस्तंभ व उल्लेखनिय कारभाराबाबत नावलौकीक प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे. 

संस्थेने हिरक महोत्सव वर्षात पदार्पन केलेमुळे त्याचे औचित्य साधुन संस्थेने सभासदांच्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुसज्ज अशी मोफत अभ्यासीका व ग्रंथालय सुरू केले आहे. अशा या संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक गरूड झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करणेस आम्ही सर्वजन कटिबध्द आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात भरीव वाढ करणेकामी निश्चित नियोजनबद्द काम करणेची ग्वाही दिली तसेच यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपने, काटकसरीने करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणार असलेचे नुतन संचालक यांनी निवडीच्या वेळी सांगीतले.

निवडीवेळी चेअरमन-संजय शिंदे, व्हा. चेअरमन-जयकुमार रेळेकर व सर्व संचालक तसेच संस्थेचे मार्गदर्शक-एम.आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम.एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन.डी.पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट, कपिल पाटील उपस्थित होते.