गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यात घटस्फोटाच्या चर्चा, अभिनेता एअरपोर्टवर स्वॅगमध्ये दिसला

गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यात घटस्फोटाच्या चर्चा, अभिनेता एअरपोर्टवर स्वॅगमध्ये दिसला

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्याबद्दल अलीकडे काही चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी घटस्फोटासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल केला असून, आता या वृत्तांवर दोघांनी मौन सोडलं आहे. दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर गोविंदा नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. त्यांच्या खास आणि हटके स्टाईलमुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गोविंदा त्यांच्या 90 च्या दशकातील सिग्नेचर लुकमध्ये दिसत आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर भरभरून प्रेम दाखवत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये गोविंदा पांढऱ्या रंगाच्या स्टायलिश पोशाखात दिसतात. त्यांनी व्हाईट जॅकेट, पॅंट आणि त्याला मॅच होणारे स्लीप - ऑन स्टाईल शूज परिधान केले होते. काळे सनग्लासेस आणि डाव्या हातातील युनिक मेटल चेन स्टाइल ब्रॅसलेटने त्यांच्या लूकला आणखी आकर्षक बनवलं होतं. संपूर्ण पोशाखात ते क्लासी, एलिगंट आणि ट्रेंडी दिसत होते.

विमानतळावर पोहोचल्यावर गोविंदा पापाराझींना स्मितहास्य देताना आणि फ्लाइंग किस करताना दिसले. त्यांच्या या स्वॅग आणि पॉझिटिव्ह अटिट्यूडवर चाहतेही खूश झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या मिशा, ब्रेसलेट आणि एकूण लूकवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, "जर मिशा असाव्यात, तर नथुलालसारख्या असाव्यात, नाहीतर नसाव्यातच!"

दरम्यान, सुनीता आहुजा यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात हिंदू विवाह कायद्यानुसार व्यभिचार, क्रूरता आणि त्याग या कारणांवरून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही गोविंदा कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पुढे जाताना दिसले. त्यांच्या या शांत आणि कूल अंदाजावरून, ते सध्या वैयक्तिक आयुष्यावरील चर्चांपासून दूर राहणं पसंत करत असल्याचं दिसून येतं.