जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी वनिता निंबाळकर आणि रंजना पाटील यांची निवड तर चारुशीला पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी वनिता निंबाळकर आणि रंजना पाटील यांची निवड तर चारुशीला पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठा सेवा संघ -जिजाऊ ब्रिगेड या संघटनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता विस्तार आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, कोल्हापूर जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवमती वनिता निंबाळकर आणि शिवमती रंजना पाटील यांची जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई बोके, प्रदेश कार्याध्यक्ष शिवमती शितोळे,  प्रदेश संघटक शिवमती बोराडे, शिवमती  शीतल मोरे तसेच विभागीय अध्यक्ष शिवमती गोविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंजुरीने ही घोषणा करण्यात आली.

​कोल्हापूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि महिलांचे संघटन तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दोन जिल्हाध्यक्षांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील दोन्ही भागांत कामाची विभागणी होऊन जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास प्रदेश नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

​"छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि महिलांच्या हक्क व सक्षमीकरणासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात कटिबद्ध राहू," अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी निवड झाल्यानंतर व्यक्त केली. यावेळी जिजाऊ ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष चारुशीला पाटील, जिल्हा सचिव सुमन वागळे, जिल्हा कार्याध्यक्ष स्मिता कोकाटे, शहराध्यक्ष त्वरिता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 

​या निवडीबद्दल जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून, नवनियुक्त जिल्हाध्यक्षांवर समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.