जिल्हा परिषदेची 20 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा; समिती सदस्यांच्या होणार निवडी
कोल्हापूर (प्रतिनिधी )जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या 20 एप्रिल रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आले असून या सभेत विविध 10 समित्यांवर सदस्यांची निवड होणार आहे. या सभेबाबत जिल्हा परिषद आधक्ष्या शिल्पा खोत यांनी नोटीस काढली आहे.

१० समित्यांवर ८० सदस्य नेमावयाचे आहेत. ६८ जिल्हा परिषद सदस्य आणि १२ पंचायत समित्यांचे सभापती अशा ८० जणांची नियुक्ती या समित्यांवर करावयाची आहे. या सर्व समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेसेना, जनसुराज्य, काँग्रेस, उद्धवसेना, स्वाभिमानी, शिवशाहू विकास आघाडी आणि यड्रावकर यांची राजर्षी शाहू आघाडी या सर्व सदस्यांना कोणत्या ना कोणत्या समितीवर संधी मिळणार आहे. महत्त्वाच्या समित्यांवर आपली वर्णी लागण्यासाठी अनेक सदस्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.




