जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकल्याण, सुशासन व लोकहितासाठी केलेल्या कार्याचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील कर्मचारी उपस्थित होते.