डीकेटीईच्या चार विद्यार्थ्यांची 'सियाराम सिल्क मिल्स'मध्ये आकर्षक पॅकेजसह निवड

डीकेटीईच्या चार विद्यार्थ्यांची 'सियाराम सिल्क मिल्स'मध्ये आकर्षक पॅकेजसह निवड

इचलकरंजी/ प्रतिनिधी : येथील नामांकित 'डीकेटीई' संस्थेच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची देशातील आघाडीची वस्त्रोद्योग कंपनी 'सियाराम सिल्क मिल्स लि.' मध्ये उत्तम पॅकेजसह निवड झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी कंपनीच्या तारापूर (पालघर) येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात विविध पदांवर रुजू झाले आहेत.

प्रशिक्षण काळातील कामगिरी ठरली मोलाची:

 सियाराम कंपनीने सुरुवातीला या विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह (Stipend) प्रशिक्षणाची संधी दिली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा १५ हजार रुपये विद्यावेतन आणि राहण्याची मोफत सुविधा देण्यात आली होती. या प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांनी दाखवलेले तांत्रिक कौशल्य, कामातील गुणवत्ता आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत कंपनीने त्यांचे मूल्यांकन केले आणि त्यांना थेट नोकरीची सुवर्णसंधी दिली. यामध्ये श्वेता बेलेकर, वक्स भाटकर, श्रावणी पाटील आणि सुमित शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

डीकेटीईची यशाची परंपरा:
डीकेटीई संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देत आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच प्लेसमेंटच्या बाबतीतही डीकेटीईने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

या घवघवीत यशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील, टीपीओ प्रा. एस. बी. अकिवाटे आणि डिप्लोमा प्रमुख प्रा. आर. के. वळसंग यांचे मार्गदर्शन लाभले.