नीट पेपरफुटी: तेजस शाहसह डॉ. मनोज शिरूरे अटकेत; १३ वी अटकही महाराष्ट्रातून

नीट पेपरफुटी: तेजस शाहसह डॉ. मनोज शिरूरे अटकेत; १३ वी अटकही महाराष्ट्रातून

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत असून नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून राज्यभरात मोठ्या कारवाईचं सत्र सुरु आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी दोघांनां अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील हि बारावी आणि तेरावी अटक आहे. गॉड  म्हणून नंबर सेव्ह केलेल्या तेजस शाह या विद्यार्थ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याने मनिषा हवालदारकडून पेपर घेतल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील तेरावी अटक सुद्धा महाराष्ट्रातूनच करण्यात आली आहे. पुण्यातून सीबीआयने अटक करण्यात आलेला हा आरोपी बालरोगतज्ज्ञ असून डॉक्टर मनोज शिरुरे असं त्याच नाव आहे. डॉ. मनोज शिरूरे सीबीआय अटकेत असून आता थोड्या वेळापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर विद्यार्थी तेजस शाह याला काल अटक करण्यात आली असून तो बारावा अटकेतील आरोपी आहे.

देशासह राज्यभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी 2 आरोपींना अटक केली असून एकूण अटक आरोपींची संख्या 13 वर पोहचली आहे. लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर पुण्यातील APMA कोचिंग संस्थेतील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भौतिकशास्त्राचे लीक प्रश्न मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशभरातील 49 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले असून तपासात अनेक कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. यात दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत 13 आरोपी अटकेत आहे. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट आणि कटकारस्थान उघड करण्यासाठी सीबीआयचा तपास सुरू आहे.