न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये पोषण सप्ताहानिमित्त स्पर्धा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये पोषण सप्ताह २०२६ निमित्त फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली देसाई उपस्थित होत्या. यावेळी डॉ. दीपाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना ‘निरोगी जीवनशैली’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. संतुलित आहार, योग्य पोषणमूल्ये आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पोषण सप्ताह २०२६ निमित्त मार्गदर्शन करताना दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक व संतुलित आहाराचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेत डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारचे पौष्टिक व आरोग्यदायी पदार्थ तयार केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचे परीक्षण प्रमुख पाहुण्या डॉ. दीपाली देसाई यांनी केले. परीक्षणादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना विविध पदार्थांमधील पोषणमूल्ये, आरोग्यास होणारे फायदे आणि संतुलित आहारातील त्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.वैष्णवी निवेकर व प्रा. धनश्री रावळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी स्पर्धक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




