रुद्र मनाडे चे सागरी जलतरण स्पर्धेत यश

रुद्र मनाडे चे सागरी जलतरण स्पर्धेत यश

 सडोली खालसा प्रतिनिधी -नुकत्याच 25 फेब्रुवारी रोजी  गुजरात येथील गीर सोमनाथ येथे झालेल्या 35 व्या वीर सावरकर ऑल इंडिया ओपन वॉटर नॉटिकल माईल्स 38 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या रुद्र सौरभ मनाडे यांने पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा पूर्ण करत सहावा क्रमांक पटकावला.

जलतरंग स्पर्धेमध्ये सर्वात अवघड मानली जाणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील 27 मुले आणि मुली सहभागी झाल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातून रुद्र मनाडे याची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण दहा क्रमांक काढण्यात आले होते. त्यामध्ये रुद्र ने सहावा क्रमांक पटकावला.

रुद्र मनाडे हा छत्रपती शाहू विद्यालय व जुनिअर कॉलेज चा विद्यार्थी असून तो पिराजीराव घाटगे ट्रस्टचे भवानी जलतरण तलाव येथे प्रशिक्षण घेत आहे. या स्पर्धेसाठी त्याला प्रशिक्षक विजय मांगलेकर,अवधूत परुळेकर व भक्ती पाटील यांचे कडून प्रशिक्षण मिळाले.  कोल्हापूर चे लोकप्रिय खासदार छत्रपती शाहू महाराज, ट्रस्टी प्रवीणसिंह घाटगे, राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.