शरद पॉलिटेक्ऩिकच्या ६४ विद्यार्थ्यांची टाटा टोयो कंपनीत निवड
यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकच्या ६४ विद्यार्थ्यांची पुणे येथील टाटा टोयो रेडिएटर लिमिटेड (टीटीआर) ह्या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.यामध्ये मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड आयटी, अॅटोमेशन रोबोटीक्स विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यामध्ये मेकॅनिकलच्या २२, मेकॅट्रॉनिक्स-१२, इलेक्ट्रीकल- १८, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर- ६, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड आयटी- १, अॅटोमेशन रोबोटीक्स विभागातील ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे विद्यार्थ्यांची कंपनीत प्रोडक्शन इंजिअनिअर्स, प्रोसेस विभागात व रोबोटीक्स ऑपरेशन्स विभागात ट्रेनीइंजिनिअर म्हणून निवड झाली आहे.
टाटा टोयो ही भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कूलिंग सिस्टीम उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः रेडिएटर्स, इंटरकूलर्स, कंडेन्सर्स, ऑईल कूलर्स, ईजीआर कूलर्स इलेक्ट्रिक वाहन शीतकरण घटक तयार करते. कंपनी ही टाटा ऑटोकाँप सिस्टीम्स व टी.रॅड, जपान यांच्या भागीदारीत आहे. कंपनी दरवर्षी सुमारे ८ दशलक्ष (८० लाख) हिट एक्सचेन्जर्स तयार करते.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. तसेच सध्या इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी असल्याची माहीती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बी.एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. बिपीन पाटील, सर्व डिन, विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.




