सोमवारी शहरातील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी): महावितरण कंपनी तर्फे 33 के.व्ही. लाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवार, दि.30 मार्च 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. यादिवशी विद्यूत पुरवठा बंद रहाणार असलेने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार, दि.30 मार्च 2026 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच मंगळवार, दि. 31 मार्च 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ,चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवलक्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांचा समावेश आहे.
तरी नागरीकानी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




