अर्बन बँकेची शाखा कूर येथे सुरू होणार - शिरीष कणेरकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील कूर गावाच्या पंचक्रोशातील शेतकरी, छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुग्ध उत्पादकांच्या मागणीनुसार दि कोल्हापूर अर्बन को - ऑप. बँकेची शाखा कूर गावात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर यांनी दिले.

कोल्हापूर अर्बन बँकेच्या गारगोटी शाखेच्या वतीने कूर गावात ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित जगदाळे यांनी स्वागत करून बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. बँकेच्या कर्ज व ठेव योजनांची माहिती विशद केली. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना जगदाळे यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन श्वेता दुकांडे यांनी केले.
यावेळी बिद्री कारखान्यांचे तज्ज्ञ संचालक जीवन पाटील, सरपंच मदन पाटील, माजी सरपंच वसंत गणपती प्रभावळे, उपसरपंच संदीप हळदकर, वसंतराव योडणकर, अनिकेत, आदींचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यास बँकेचे शाखा व्यवस्थापक अमर नाईक, मार्केटिंग ऑफिसर जगदीश कणेरकर, असिस्टंट जनरल मॅनेजर शशांक थोरवत, उपाध्यक्ष जयसिंगराव माने, विश्वासराव काटकर, राजन भोसले, संभाजीराव जगदाळे, अभिजित मांगरे, संचालक दीपक चव्हाण उपस्थित होते.




