पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह

पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह

पुणे - राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पुण्यात याचं प्रमाण अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील नामांकित एमआयटी (MIT) महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव सुभाष कामठे (वय 65) असून, ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील एका लहान तलावात काल (गुरुवारी) दुपारी आढळून आला. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.सुभाष कामठे हे पुण्यातील फुरसुंगी परिसरात वास्तव्यास होते. त्यांना मद्यसेवनाची सवय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.