महिला गर्भवती राहू नयेत म्हणून खरात काय करायचा? पोलीस घेताहेत शोध

महिला गर्भवती राहू नयेत म्हणून खरात काय करायचा? पोलीस घेताहेत शोध

मुंबई (प्रतिनिधी) :अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच अशोक खरात याच्याविरोधात पोलिसांकडून सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. दरम्यान, अशोक खरातने लैंगिक शोषक केलेल्या महिलांपैकी कुणीही त्याच्यापासून गर्भवती राहिलेली नसल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे लैंगिक शोषणानंतर एखादी महिला गर्भवती राहू नये म्हणून भोंदू अशोक खरात नेमकं काय करायचा, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

विविध समस्या घेऊन आलेल्या महिलांचं अशोक खरात हा तांत्रिक विधी, योनी शुद्धिकरण अशी कारणं देऊन लैंगिक शोषण करत असे. या दरम्यान, अशोक खरात हा विशिष्ट्य चव असलेलं पाणि आणि पेढा प्रसाद म्हणून देत असे. तसेच हा प्रसाद खाल्ल्यानंतर गुंती येऊन काय चालंल आहे याची शुद्ध राहत नसे, अशी माहिती पीडित महिलांनी दिली आहे. दरम्यान, समस्या घेऊन आलेल्या महिलांचं लैंगिक शोषण करणारा अशोक खरात हा अशा महिलांशी आलेल्या शरीर संबंधांमधून त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी विशिष्ट प्रकारचं गर्भनिरोधक औषध वापरत असावा, असा संशय तपास करणाऱ्या पोलिसांना येत आहे. तसेच या प्रकरणी पोलिकांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

 लैंगिक शोषण झालेल्या महिलांना आपल्यापासून गर्भधारणा होऊ नये यासाठी अशोक खरात हा या महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने काही गर्भनिरोधक गोळ्या वा औषध द्यायचा का याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच महिलांचं लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना संमोहित करण्यासाठी खरातकडून काही औषधांचा वापर केला जात होता का , याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.