आत्मचिंतनाशिवाय पर्याय नाही'; संजय राऊतांच्या 'रोखठोक'मधून कुणाला इशारा?

आत्मचिंतनाशिवाय पर्याय नाही'; संजय राऊतांच्या 'रोखठोक'मधून कुणाला इशारा?

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना फुटीचं ग्रहण सुरूच असताना आता आमदार सचिन अहिरे यांनी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता खासदार फुटल्यानंतर आता आमदार सुद्धा फुटू लागल्याने शिवसेना ठाकरे गट गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे का? असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. ही सर्व चर्चा होत असतानाच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक स्पष्ट वक्तव्य केल्याने नेमका रोख कोणाकडे? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की राजकीय भविष्यासाठी आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. 

सचिन अहिरे फुटल्याने आदित्य ठाकरे यांची वरळी विधानसभेत अडचण वाढली आहे का? संदर्भात बोलताना म्हणाले की, आदित्य ठाकरे दोनवेळा आमदार झाले आहेत. त्यामुळे माणसाला समाधानी राहणं फार आवश्यक आहे. सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना त्यांनी सांगितलं की अंधारात झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले आहेत. तुमचा हा राजकीय प्रवास असला तरी तुम्हाला इतिहास हा कलंकित करणारा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, सगळं दिल्यानंतरही तुम्ही जात असाल, तर तुम्हाला राजकीय लालसा ही संपवून टाकत असते. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीही नको आहे. राज्यामध्ये नासाडी सुरू असून एक प्रकारे अधःपतन सुरू असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की पक्षासोबत राहणारे कार्यकर्ते हे दुर्मिळ असतात.