करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे कृषी पंपांच्या केबल चोरीचे प्रकार
सडोली (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील हसुर दुमाला या गावातील नऊ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या असून त्या सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या होत्या. हा केबल चोरीचा प्रकार दुसऱ्यांदा घडला असून गेल्या वर्षी दहा शेतकऱ्यांच्या केबल चोरीस गेल्या होत्या.

ऐन उन्हाळ्यात चोरट्यांनी कृषी पंपांच्या केबल चोरल्यामुळे पीकांना पाणी देणे लांबले असून शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे, तसेच कॉपरच्या वाढत्या किंमती त्यातच चोरी गेलेल्या केबल यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानास सामोरे जावे लागत आहे.
या चोरी बाबत करवीर पोलिस ठाण्यात शेतकरी उत्तम पाटील फिर्याद दिली असून राजाराम पाटील, सचिन कुलकर्णी,गणेश झांजगे, सरदार पाटील, उदय पाटील, बापूसो कानुगडे, बाबूराव पाटील या शेतकऱ्यांच्या देखील केबल चोरीस गेल्या आहेत.या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.




