काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधवांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधवांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) - काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, अभिजीत जाधव, कपिल पोवार, कपिल केसरकर, प्रभु गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते.