कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक! सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत शाहू समाधी स्थळी आंदोलन

कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक! सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत शाहू समाधी स्थळी आंदोलन

कोल्हापूर/प्रतिनिधी : नीट पेपर फुटी प्रकरणा नंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणी करता कॉक्रोच जनता पार्टीने मोठं जन आंदोलन उभ केला आहे या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर-मंतरवर  विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी बेमुदत उपोषणाला बसलेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा अठरावा दिवस आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. केंद्र सरकार नाही त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळं या आंदोलनाचे पडसाद आता देशभरात उमटू लागले असून, ऐतिहासिक कोल्हापूर नगरीतूनही या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने  निदर्शने करण्यात आली.  

आज कोल्हापुरातील ऐतिहासिक शाहू समाधी स्थळ येथे 'इंडिया आघाडी'च्या वतीने एकवटून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

शाहू समाधी स्थळाच्या परिसरात इंडिया आघाडीच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून केंद्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला. 

या आंदोलनात इंडिया आघाडीचे प्रमुख नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.