कोल्हापूर अर्बन को-ऑप बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांना 10% लाभांश जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना भागभांडवलावर 10 टक्के लाभांश देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ही सभा रामगणेश गडकरी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर होते.

सिस्टिम ऑडिटर अमोल आहेर यांनी उपस्थित सभासदांना सायबर व डिजिटल बँकिंग फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले. बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित जगदाळे यांनी विषयपत्रिकेवरील मुद्दे वाचून सादर केले. सभासद सुभाष सावंत, किसन कल्याणकर, पंडित कंदले, हारुण मोमीन, रवींद्र गुरव, संभाजीराव पोवार, प्रा. रूपा शहा आणि सुभाष सुर्वे यांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष कणेरकर व सीईओ जगदाळे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
सभेत सत्यशोधक सहकारी बँकेचे अध्यक्ष महेंद्र शिंदे आणि कमर्शिअल बँकेचे संचालक व्हटकर यांचा नागरी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सभागृहात डिजिटल बँकिंगचा वापर वाढविण्यासाठी जनजागृतीचे फलक लावण्यात आले होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि बँकेत ६१ वर्षे पूर्ण केलेल्या १०५ ज्येष्ठ सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, माजी अध्यक्ष शिवाजीराव कदम, अब्दुलरजाक कच्छी आणि इतर दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष शिरीष कणेरकर यांनी स्वागतपर भाषणात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला, तर उपाध्यक्ष जयसिंगराव माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी संचालक अॅड. यशवंत साळोखे, सुभाष भांबुरे, मधुसूदन सावंत, राजन भोसले, विश्वासराव काटकर, अॅड. रवींद्र धर्माधिकारी, संभाजी जगदाळे, अभिजित मांगरे, अॅड. प्रशांत शिंशंदे, नंदकिशोर मकोटे, संध्या घोटणे, सचिन कुलकर्णी, दीपक चव्हाण, व्यवस्थापक मंडळ सदस्य दिलीप फडणीस, सुबराव पवार, कमर्शिअल को-ऑप. बँकेचे अध्यक्ष अतुल शहा, उपाध्याक्ष शर्मिला शिरीष कणेरकर, अॅड. शामराव शिदि उपाध्यक्ष कदम उपस्थित होते.




