क्रिडाई कोल्हापूर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

क्रिडाई कोल्हापूर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक शिखर संघटना असून बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्या बरोबर अनेक सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेत आलेली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही 15 सप्टेंबर हा दिवस मोक्षगुडंम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूर तर्फे रक्तदान शिबीर बालाजी गार्डन येथे आज 16 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरवात क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, संचालक चेतन चव्हाण, सुनिल चिले , मौक्तीक पाटील,महालक्ष्मी ब्लड बँक चे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे, क्रिडाई कोल्हापूर युथ विंग प्रणव क्षीरसागर, सभासद  विश्वजीत जाधव, संतोष पाटील,मौसीन मुल्लानी यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलनाने झाली.

आजच्या रक्तदान शिबिरात क्रिडाई कोल्हापूर चे पदाधिकारी, सभासद, युथ विंग, वुमेन्स विंग सदस्य व क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांचा स्टाप यांनी  उस्फुर्त भाग घेऊन रक्तदान केले. आपले सभासद अनंत मुरगूडे यांनी आज अखेर 116 वेळा, संदिप मिरजकर यांनी 30, सचिन घाटगे यांनी 26 वेळा रक्तदान केले.

तसेच या शिबीरासाठी महालक्ष्मी ब्लड बँकचे प्रमुख डॉ. विजयकुमार बर्गे व स्टाफ यांनी ब्लड कलेक्शन ची उत्तम व्यवस्था ठेवली होती. यावेळी अध्यक्ष के.पी.खोत यांनी महालक्ष्मी ब्लड सेंटरचे प्रमुख डॉ. विजयकुमार बर्गे यांचेकडे रक्ताच्या 60 बॅग सुपूर्द केल्या.

या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, तसेच कारवाचे चेअरमन रत्नेश शिरोडकर, महालक्ष्मी ब्लड बँकचे प्रमुख डॉ. विजयकुमार बर्गे व स्टाफ, डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या  सुपरिडेंट डॉ. वैशाली गायकवाड, क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस, अजय डोईजड, सहखजानिस श्रीराम पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, अमोल देशपांडे, संग्राम दळवी,सुनिल चिले, मौक्तीक पाटील, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील, श्रेयांस मगदूम, संजय डोईजड,सचिन घाटगे, माजी सचिव संदीप मिरजकर, विश्वजीत जाधव, सचिव गणेश सावंत, युथ व वुमेन्स विंगचे सदस्य, क्रिडाई कोल्हापूर चे सभासद हजर होते.