घोडावत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; फार्मसीच्या पराग भोपाळेला लक्झेंबर्गमध्ये मिळाली नोकरी!
कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील 'स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस'मधील विद्यार्थी पराग भोपाळे याने घवघवीत यश संपादन केले आहे. परागला लक्झेंबर्गमधील नामांकित 'फार्मासी हॅमिलुअस' या कंपनीत थेट नोकरीची संधी मिळाली आहे. या नोकरीसाठी त्याला वार्षिक ३८.४३ लाख रुपयांचे घवघवीत पॅकेज प्राप्त झाले असून, विद्यापीठाच्या फार्मसी विभागातील आतापर्यंतचे हे सर्वोच्च पॅकेज ठरले आहे.

या यशाबद्दल बोलताना विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, हा टप्पा म्हणजे विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा, व्यवहारिक शिक्षण आणि प्लेसमेंट विभागाच्या अविरत प्रयत्नांचे फलित आहे. यामुळेच आज आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.
परागच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, टीपीओ संचालक डॉ. नितीन पुजारी आणि संपूर्ण प्राध्यापक वर्गाने त्याचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




