प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा पाटील तर उपाध्यक्षपदी गजानन कांबळे यांची निवड

प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा पाटील तर उपाध्यक्षपदी गजानन कांबळे यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेमध्ये सातापा विष्णू पाटील तालुका करवीर यांची अध्यक्षपदी तर गजानन सखाराम कांबळे तालुका गगनबावडा यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

या बँकेची संचालक मंडळाची सभा रविवारी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरता सहाय्यक निबंधक चंद्रकांत इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अन्य कोणाची नामनिर्देशक पत्रिका नसल्याने अध्यासी अधिकारी चंद्रकांत इंगवले यांनी सातापा पाटील यांची अध्यक्षपदी तर गजानन कांबळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर केली.

 नूतन अध्यक्ष सातापा पाटील यांनी बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. या संधीचा मी बँकेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन असेही त्यांनी सांगितले.

 या सभेस संचालक बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, सुनील एडके, अर्जुन पाटील, शिवाजी रोडे पाटील, सुरेश कोळी, वर्षा केनवडे, नंदकुमार वाईंगडे, अमर वरुटे, शिवाजी बोलके, रामदास झेंडे, बाबू परीट, गौतम वर्धन तसेच सुकाणू समितीचे रवीकुमार पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, विविध संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सभासद तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.