जिल्हा परिषद येथे माहिती अधिकार दिन कार्यशाळा संपन्न

जिल्हा परिषद येथे माहिती अधिकार दिन कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. 

प्रथम सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय शिंदे, सहायक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि.प.कोल्हापूर यांनी केले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून विक्रमसिंह विश्वास चौगले लाभले. त्यांनी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी व त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी या संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी , कक्ष अधिकारी, अधिक्षक व कनिष्ठ लिपीक असे एकूण 97 कर्मचारी उपस्थित होते.  

ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जि.प.कोल्हापूर यांनी विक्रमसिंह विश्वास चौगले यांचे उत्कृष्ट मार्गदर्शनबाबत आभार व्यक्त करुन कार्यशाळेचा समारोप केला.

या कार्यशाळेस संतोष जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख कार्यकारी अधिकारी (सा.प्र) व जयवंत उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद कोल्हापूर हे उपस्थित होते.