जेईई मेन्स 2026 परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट पश्चिम महाराष्ट्रात अव्वल
इचलकरंजी (प्रतिनिधी):नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारा घेण्यात आलेल्या व अभियांत्रिकी प्रवेशातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जेईई मेन्स 2026 परीक्षेच्या सेशन 1चा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत इचलकरंजी मधील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त करून खूप मोठे यश संपादन केले.

श्रद्धा इन्स्टिट्यूटचा प्रणव बागरेचा या विद्यार्थ्याने 99.97 % पर्सेंटाइल मिळवून श्रद्धाचे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमधील वर्चस्व अबाधित राखले. या विद्यार्थ्यांसहित कु.पाटील सोहम 99.90 पर्सेंटाइल, कोरे प्रणव 99.77 पर्सेंटाइल, म्हेत्रे मनस्वी 99.76 पर्सेंटाइल, सस्ते पियुष 99.75 पर्सेंटाइल, आशिष जहांगीरदार 99.72, तोतला श्रेष्ठ 99.69, नवले अनुज 99.53, नलावडे सायली 99.45, पाटील समृद्धी 99.37, धैर्य चौधरी 99.36, दाते अभेद्य 99.29, कापडी अथर्व 99.27, साखरे पृथ्वीराज 99.24, खोत मानसी 99.23, कदम नीलभ 99.8, तोतला मयंक 99.7, कदम अजिंक्य 99.7, अडसुळे हर्षल 99.3, केसवानी प्रांजल 98.96, पाटील ईश्वरी 98.96, घाटुळे संकेत 98.91, गंगारडे श्रेया 98.85, पाटील अनन्या 98.84, गडदे अथर्व 98.79, भुइंगडे सोमनाथ 98.77, शिंदे प्रणव 98.73, काबरा जान्हवी 98.65, कदम सुशांत 98.63, लाड योगेश्वरी 98.61, शिंदे अनिकेत 98.56, तेलसिंगे पूर्वा 98.54, गडदे वेदांत 98.54, चव्हाण आर्या 98.54, दानवाडे मुशरत 98.52, पाटील सौमित्र 98.47, कोळके रजत 98.35, रेपे अथर्व 98.31, पाटील विरेन 98.26, कुंभार विवेक 98.18, पवार वेदांत 98.16, कबाडे आदित्य 98.13, ढेंबरे मयुरेश 98.10, पाटील आदित्य 98.10, बाहेती रोनक 98.10 या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले. या निकालात 99 पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवणारे 19 विद्यार्थी व 90 पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवणारे तब्बल 158 विद्यार्थी आहेत. विशेष बाब म्हणजे हे सगळे निकाल एकाच ब्रँच मधून लागल्याने निकालात नेहमीच अग्रेसर अशी उपमा लाभलेल्या श्रद्धा इन्स्टिट्यूटने ही परंपरा अबाधित ठेवली आहे. हे यश म्हणजेच संस्थेचे अचूक नियोजन, परीक्षाभिमुख शिस्त, इफेक्टिव्ह टेस्ट सिरीज, आणि पालकांचा संस्थेवरील विश्वास याचे दयोतक म्हणावे लागेल. उत्कृष्टतेचे एक नवे पर्व, अभूतपूर्व निकालाचा एक नवीन अध्यायच दरवर्षी श्रद्धा इन्स्टिट्यूट निर्माण करीत असते.
यशाची उंची गाठत असताना योग्य नियोजन आणि अपार कष्टाची जोड लागते आणि ते कष्ट आणि नियोजन योग्य मार्गदर्शनाखाली झाले की, असे असामान्य निकालात त्याचे परिवर्तन होते असे मत संस्थेचे अध्यक्ष ए आर.तांबे सर यांनी व्यक्त केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ए.आर तांबे सर, समन्वयक एम.एस पाटील, संगीता पवार, सुप्रिया कौंदाडे , अभिषेक तांबे, सृष्टी तांबे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.




