ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर; संजय राऊतांची जोरदार टीका
मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेत शिंदे गटाशी जवळीक साधल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली.सहा खासदारांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, हा पक्षनिष्ठेला धक्का देणारा निर्णय आहे. त्यांनी आपल्या खास शैलीत या घडामोडींवर भाष्य करत शिंदे गटावर निशाणा साधला.

ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, बाळासाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याची माहिती आहे.मुंबईत परतल्यानंतर या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. दरम्यान, या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे पत्र ओम बिर्ला यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
लवकरच हे सर्व खासदार शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घडामोडींवर आता शिंदे गटाकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




