डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलरेचे तृतीय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलरेचे तृतीय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त

इचलकरंजी ( प्रतिनिधी ): डीकेटीईच्या इटीसी विभागातील तृतीय वर्ष बी.टेक.चे विद्यार्थी मंथन डोणे व ओंकार कोरे यांनी तोशिबा सॉफटवेअर इंडिया प्रा. लि. बेंगलुरु यांच्या वतीने आयोजित ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉन मध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत तृतीय क्रमांकांचे बक्षिस मिळवत ७५० अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक पटकविले.

ग्रीडडीबी यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय आयओटी स्तरावरील हॅकॅथॉन’ या स्पर्धेमध्ये देशभरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. प्राथमिक फेरीत देशभरातून मोठया संख्येने संघ सहभागी झाले होते. तोशिबा व ग्रीड डीबी मधील विरष्ठ तांत्रिक तज्ञांनी केलेल्या कोटेकोर मूल्यमापनानंतर २८ संघाची निवड पुढील फेरीसाठी करण्यात आली. अंतीम टप्प्यात केवळ ५ संघ पात्र ठरले असून, त्यामध्ये डीकेटीईच्या टीम व्हाईटलवॉच चा समावेश होतो. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत व्हायटॉलवॉच टीमने तृतीय क्रमांक मिळवत ७५० अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक पटकविले.

ग्रीडडीबी हे एक लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून प्रामुख्याने कॉम्पुटर सायन्स, प्रोग्रॅमिंग आणि तंत्रज्ञानावर केंद्रित शैक्षणिक सामग्री प्रदान करते. या हॅकाथॉनमध्ये आयआयटीसह नामांकित संस्थांतील विद्यार्थी व उद्योग क्षेत्रातील तज्ञांचा थेट सहभाग असल्याने स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च होती. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य आणि नाविण्यपूर्ण उपयांसह देशातील सहभागी झालेल्या टीम्स मध्ये तृतीय स्थान पटकविले.

या स्पर्धेसाठी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक संकल्पनेव्दारे त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देत समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेला व्हाईटलवॉच हा प्रकल्प मानवी शरीरातील रक्तदाब, रक्तातील साखर यांसारख्या महत्वाच्या आरोग्य घटकांचे सातत्याने निरीक्षण करणा-या आयओटी-आधारित रिअल टाईम हेल्थ मॉनिटरिंग प्रणालीवर आधारित आहे. संभाव्य आरोग्यविषक धोके वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात हा या प्रकल्पाचा मुख्य उददेश आहे. या यशातून डीकेटीई इन्स्टिटयूटमध्ये उपलब्ध असलेले भक्कम तांत्रिक मार्गदर्शन, नवोपक्रमशील शैक्षणिक संस्कृती व उद्योगाभिमुख शिक्षण वातावरण अधोरेखित झाले आहे.

डीकेटीईमध्ये नेहमी अशा पध्दतीच्या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करुन देते या मध्ये यशस्वी होण्यासाठी येथील तज्ञ प्राध्यापकाकडून विविध प्रकारच्या ट्रेनिंग आणि प्रॅक्टीकलची तयारी करुन घेतली जाते. अभ्यासाव्यतीरिक्त इंडस्ट्रीला लागणा-या नविन टेक्नॉलॉजी संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्यामुळेच डीकेटीईचे विद्यार्थी देशभरात चमकतात.  

डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,मानद सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.